शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

मीटर बदलण्यासाठीही अनेक महिन्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:27 IST

अकोला : वीज ग्राहकांना कोणत्याही समस्या भेडसावू नयेत, यासाठी महावितरणने ऑनलाइन सेवेपासून ते विशेष कक्षापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात वीज ग्राहकांना त्याचा फायदा मिळत नसल्याचे वास्तव आहे. नवीन जोडणी मिळविण्यासाठी तर हेलपाटे घ्यावे लागतातच, शिवाय तांत्रिक बिघाड असलेले विद्युत मीटर बदलवून घेण्यासाठीही वीज ग्राहकांच्या नशिबी दोन-दोन महिन्यांची प्रतीक्षाच येते.

ठळक मुद्देभार तपासणीसाठी ठेवले जाते ताटकळत वीज ग्राहकांना सोसावा लागतो भुर्दंड

अकोला : वीज ग्राहकांना कोणत्याही समस्या भेडसावू नयेत, यासाठी महावितरणने ऑनलाइन सेवेपासून ते विशेष कक्षापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात वीज ग्राहकांना त्याचा फायदा मिळत नसल्याचे वास्तव आहे. नवीन जोडणी मिळविण्यासाठी तर हेलपाटे घ्यावे लागतातच, शिवाय तांत्रिक बिघाड असलेले विद्युत मीटर बदलवून घेण्यासाठीही वीज ग्राहकांच्या नशिबी दोन-दोन महिन्यांची प्रतीक्षाच येते.महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी अशा सर्वच प्रकारच्या ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. वीज ग्राहकांना सर्व सुविधा घरबसल्या मिळाव्या, यासाठी महावितरणने अनेक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. याशिवाय आणखी काही अडचणी असतील, तर ग्राहक सुविधा केंद्रही अस्तित्वात आहे. या सर्व सुविधा असतानाही वीज ग्राहकांना मात्र हेलपाटे घ्यावेच लागतात. महावितरणच्या अकोला ग्रामीण, अकोला शहर व अकोट विभागात सध्या नवीन मीटरचा तुटवडा असल्याने नवीन वीज जोडणी घेण्यासाठी ग्राहकांना पैसे भरल्यानंतरही प्रतीक्षा करावी लागत आहे. काही वीज ग्राहक वीज बिल अधिक येत असल्यामुळे महावितरणकडे रीतसर शुल्क भरून विद्युत उपकरण तपासणीसाठी अर्ज करून विद्युत मीटर बदलून देण्याची मागणी करतात; परंतु या ग्राहकांनाही तीन-तीन महिने ‘वेटिंग’वर ठेवले जाते. घरातील वीजभार मोजणारे अँक्युचेक यंत्रांचा तुटवडा हेदेखील या मागचे एक कारण असल्याचे महावितरणमधील सूत्रांचे म्हणणे आहे. 

नवीन विद्युत मीटर आले; प्रतीक्षा कायमच!अलीकडे काही नवीन विद्युत मीटर आल्याचे अधिकारी सांगत असले, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. नवीन मीटर येऊनही ग्राहकांची वीज जोडणीची प्रतीक्षा कायमच आहे. आता नवीन वीज जोडणी देण्यापूर्वी विद्युत मीटरची ऑनलाइन नोंद ठेवावी लागते. पूर्वी अशी नोंद ठेवण्याची गरज नव्हती. आता मात्र ऑनलाइन नोंद केल्यानंतरच वीज ग्राहकांना मीटर दिले जाते. यामुळे कारभार पारदर्शक झाला असला, तरी तो वेळखाऊ ठरत आहे. 

मुख्यालयात विशेष कक्षग्राहकांना नवीन वीज जोडणीसाठी तत्परतेने आणि घरपोच सेवा मिळावी, यासाठी महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात 0२२-२६४७८९८९ व 0२२-२६४७८८९९ या दूरध्वनी क्रमांकावर ग्राहकाने नवीन वीज जोडणी, नावात बदल यासाठी संपर्क साधल्यास कक्षाच्यावतीने या सुविधांसाठी ग्राहकांना तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.