शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बदलून आलेल्या पोलीस निरीक्षकांना चांगल्या ‘पोस्टिंगची’ प्रतीक्षा

By admin | Updated: June 17, 2015 02:12 IST

शहरातील ठाण्यात रिक्त पद.

अकोला: अनेक वर्ष बाहेरगावी राहून अखेर अकोल्यात बदलीवर आलेल्या काही पोलीस निरीक्षकांना चांगल्या पोस्टिंगची प्रतीक्षा आहे. शहरातील स्थानिक गुन्हे शाखा, सिव्हिल लाइन पोलीस ठाणे, डाबकी रोड पोलीस ठाणे, आकोट फैल पोलीस ठाण्यांमधील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने या ठाण्यांमधील पदे रिक्त आहेत. त्यामुळे बदलीवर आलेले पोलीस निरीक्षक चांगल्या पोलीस ठाण्यात आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्नरत आहेत. काही दिवसांपूर्वीच नागपूर येथून पोलीस निरीक्षक सुभाष माकोडे, अनिल जुमडे, भास्कर तंवर यांची अकोल्यात बदली झाली. तीन पोलीस निरीक्षकांना पोलीस अधीक्षकांनी अद्यापपर्यंत कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. या तीनही अधिकार्‍यांना अकोल्यात काम केल्याचा दीर्घ अनुभव आहे. पोलीस निरीक्षक सुभाष माकोडे हे एलसीबीचे प्रमुख होते. यासोबतच आकोटच्या ठाणेदार पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. भास्कर तंवर यांनी जुने शहर पोलीस ठाणे, आकोटचे ठाणेदार म्हणून अनेक वर्ष काम केले. अनिल जुमडे यांनीसुद्धा रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. तसेच शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये काम करण्याचा अनुभवही त्यांना आहे. त्यांना अकोल्यातील गुन्हेगारीची इत्थंभूत माहिती आहे. सध्या शहरातील स्थानिक गुन्हे शाखेसह सिव्हिल लाइन पोलीस ठाणे, आकोट फैल, डाबकी रोड पोलीस ठाण्यांमधील पदे रिक्त आहेत. सिव्हिल लाइनचे ठाणेदार डी.डी. ढाकणे यांची बुलडाणा येथे, डाबकी रोडचे ठाणेदार भारत रक्षाकर यांची पदोन्नतीवर पोलीस उपअधीक्षकपदी औरंगाबाद येथे, आकोट फैलचे प्रकाश निंघोट यांची नियंत्रण कक्षात बदली झाल्याने ही पदे रिक्त झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि तीनही पोलीस ठाणे महत्त्वाची असल्याने, या तिघांपैकी कोणाची वर्णी लागते, याकडे पोलीस खात्याचे लक्ष आहे. चांगल्या पोलीस ठाण्यात आपली वर्णी लागावी यासाठी तिघेही पोलीस अधिकारी प्रयत्न असल्याचे समजते.