अकोला जिल्हा परिषदेतून ‘डीपीसी’ सदस्यांसाठी १८ मार्चला मतदान

By Admin | Updated: January 15, 2015 01:24 IST2015-01-15T01:24:28+5:302015-01-15T01:24:28+5:30

निवडणूक कार्यक्रम जाहीर

Voting on March 18 for DPC members for Akola District Council | अकोला जिल्हा परिषदेतून ‘डीपीसी’ सदस्यांसाठी १८ मार्चला मतदान

अकोला जिल्हा परिषदेतून ‘डीपीसी’ सदस्यांसाठी १८ मार्चला मतदान

अकोला: जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) १५ जागांवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अरुण शिंदे यांनी बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या निवडणुकीसाठी १८ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद मतदारसंघातून १५ सदस्यांची निवड करावयाची आहे; मात्र गतवर्षी लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकांच्या धावपळीत जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्याची प्रक्रिया रखडली. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषद सदस्यांची मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी शिंदे यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ह्यडीपीसीह्ण सदस्य पदांसाठी जिल्हा परिषदेच्या १५ सदस्यांची निवड करण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. १८ फेब्रुवारी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, २0 फेब्रुवारी रोजी वैध नामनिर्देशनपत्रांची यादी जाहीर केली जाईल. नामनिर्देशनपत्र फेटाळल्या प्रकरणात २४ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे अपील दाखल करता येईल. अपिलावरील अंतिम निर्णयाचा कालावधी २६ फेब्रुवारीपर्यंत असून, नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी २ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ३ मार्च असून, निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी ४ मार्च रोजी जाहीर केली जाणार आहे. १८ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार असून, १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात मतमोजणी करण्यात येणार आहे.

Web Title: Voting on March 18 for DPC members for Akola District Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.