शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
2
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
3
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
4
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
5
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
6
तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
7
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये प्रशिक्षणादरम्यान इंदिरा गांधी कालव्यात लष्कराचा टँक बुडाला; एका जवानाचा मृत्यू
8
सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
9
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
10
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
11
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
12
अखेर केडीएमसीने मॅनहोलमध्ये पडलेेल्या 'त्या' मुलाच्या मृत्युची जबाबदारी घेतली, पालकांना देणार सहा लाख
13
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
14
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
15
हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार
16
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
17
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
18
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
19
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
20
Palash Muchhal: पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या मनाचा ठाव घेणारा कवी  डॉ. विठ्ठल वाघ - संजय धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 19:43 IST

तुकडोजी महाराजांचा वसा घेऊन चालणारा कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा सत्कार आपल्या हातून होणे हे भाग्यच, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.

अकोला : शेतकऱ्यांच्या व्यथा समाजापर्यंत पोहोचविणारा, समाजप्रबोधन करणारा अन् लोकांच्या मनाचा वेध घेणारा कवी म्हणजेच डॉ. विठ्ठल वाघ आहेत. समाजसुधारक तसेच गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांचा वसा घेऊन चालणारा कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा सत्कार आपल्या हातून होणे हे भाग्यच, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.शिवाजी महाविद्यालय येथे रविवारी आजोजित लोककवी डॉ. विठ्ठल वाघ अमृत महोत्सव सोहळ््याच्या उद््घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी सत्कारमूर्ती लोककवी डॉ. विठ्ठल वाघ, प्रतिभाताई वाघ, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, आयोजन समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, स्वागताध्यक्ष प्रा. तुकाराम बिरकड, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय नरेशचंद्र ठाकरे, महापौर अर्चना मसने, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गजानन पुंडकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य केशवराज मेतकर, रामचंद्र शेळके, हेमंतजी काळमेघ, शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक केशव गावंडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अपराजित यांनी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या साहित्यावर विश्लेषण करत, वºहाडी भाषेला सातासमुद्रापार नेणारे महाराष्ट्रातील एकमेव कवी असल्याचे सांगितले. तसेच ‘सूर्य-चंद्र जरी आले हाती विसरू नको माती’ याप्रमाणे डॉ. विठ्ठल वाघ हे आपल्यावरचं नातं जपून आहेत. कळवळीतून शब्द मांडणारा कवी म्हणजे डॉ. विठ्ठल वाघ असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. यानंतर सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राजदत्त यांनी डॉ. वाघ यांच्याशी असलेलं नातं अन् त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. विठ्ठल वाघ यांच्या बोलण्यातून बाण निघतात, फटाके फुटतात तसेच त्यांच्यातील कवितेमधून शेतकऱ्यांबद्दल या मातीत सामान्य शेतमुजराबद्दल कळवळादेखील दिसून येत असल्याचे मत राजदत्त यांनी व्यक्त केले. संचालन धनंजय मिश्रा आणि आभार प्रदर्शन श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी मानले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे