दृष्टी गमावलेल्या नेत्ररुग्णांची ‘विट्रेक्टॉमी’ शस्त्रक्रिया
By Admin | Updated: November 5, 2015 02:02 IST2015-11-05T02:02:17+5:302015-11-05T02:02:17+5:30
जे.जे. रुग्णालयात जाऊन पालकमंत्र्यांनी केली चौकशी.

दृष्टी गमावलेल्या नेत्ररुग्णांची ‘विट्रेक्टॉमी’ शस्त्रक्रिया
अकोला: वाशिम येथील सामान्य रुग्णालयात १५ ऑक्टोबर रोजी केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया अपयशी ठरल्याने १0 ते १२ रुग्णांना दृष्टी गमवावी लागली. या सर्व रुग्णांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर ह्यविट्रेक्टॉमीह्ण शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी अकोला व वाशिम जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन भरती रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. संचालक आरोग्य डॉ.पवार, नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ.रत्ना पारीक यांनी रुग्णांच्या प्रकृतीबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना माहिती दिली आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सुद्धा सांगितले. वाशिम येथील सामान्य रुग्णालयात १७३ रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १0 ते १२ वृद्धांच्या डोळय़ांची जळजळ आणि दृष्टी धुसर झाल्याची तक्रार आली. रुग्ण वाशिम येथील सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील नेत्ररोग तज्ज्ञांनी सर्व रुग्णांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला. रुग्ण येथील रुग्णालयात भरती झाल्यावर नेत्ररोग तज्ज्ञांनी सर्व रुग्णांची तपासणी केली आणि तातडीने त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविले. याठिकाणी या सर्व रुग्णांवर ह्यविट्रेक्टॉमीह्ण पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, ही घटना अकोला व वाशिम जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना कळल्यावर त्यांनी बुधवारी जे.जे. रुग्णालयामध्ये जाऊन सर्व नेत्र रुग्णांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. १७३ नेत्र रुग्णांच्या घरी जाऊन चौकशी आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांच्या आदेशानुसार वाशिम येथील सामान्य रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या १७३ रुग्णांच्या घरी जाऊन वाशिम येथील वैद्यकीय चमूने चौकशी केली आणि त्यांची तपासणी केली. दरम्यान, चमूला ४ ते ५ रुग्णांची सुद्धा दृष्टी धुसर झाल्याचा प्रकार समोर आला. वैद्यकीय चमूने या रुग्णांना सुद्धा मुंबईला रवाना केले. नागपूरची चमूही पोहोचली वाशिममध्ये वाशिम सामान्य रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूर येथील दोन नेत्ररोग तज्ज्ञांच्या समितीने वाशिम सामान्य रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करणार्या नेत्ररोग तज्ज्ञांची चौकशी केली आणि प्रकरणाची तपासणी केली. तसेच आरोग्य उपसंचालक डॉ. लव्हाळे यांनी नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय समितीने सुद्धा रविवारी वाशिमला जाऊन प्रकरणाची चौकशी केली.