बालकांना ‘व्हायरल मायोसायटिस’चा धोका!

By Admin | Updated: November 17, 2014 01:36 IST2014-11-17T01:36:38+5:302014-11-17T01:36:38+5:30

२ ते १४ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये अधिक प्रमाण

Viral microsatitis risk of children! | बालकांना ‘व्हायरल मायोसायटिस’चा धोका!

बालकांना ‘व्हायरल मायोसायटिस’चा धोका!

सचिन राऊत / अकोला
बालकांच्या हात-पायासोबतच शरीरातील मासपेशीमध्ये प्रचंड तणाव आणि हात पाय दुखणे या ह्यव्हायरल मायोसायटीसह्ण आजाराचा बालकांना धोका वाढला आहे. २ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये या आजाराचे अधिक प्रमाण असून वातावरणातील बदल आणि डेंग्यूच्या उद्रेकामुळे हा आजार वाढत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळाली आहे.
अकोला शहरासह बाळापूर, आकोट आणि तेल्हारा शहरामध्ये डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाल्यानंतर ग्रामीण भागातील तब्बल २४७ खेड्यांमध्ये डेंग्यूचा फैलाव झाला आहे. या आजाराला रोखणे आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर गेले असतानाच वातावरणात बदल झाल्याने २ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना आता ह्यव्हायरल मायोसायटिसह्ण या आजाराने ग्रासले आहे.
प्रचंड उन्हं आणि गत तीन दिवसांपासून पावसामुळे बदललेल्या वातावरणाने बालकांना विविध आजारांचा त्रास होत असून, यामध्ये ह्यव्हायरल मायोसायटिसह्ण या आजाराची मुले जास्त प्रमाणात उपचारासाठी भरती आहेत.
ह्यव्हायरल मायोसायटिसह्णमुळे मुलांच्या हात आणि पायातील मासपेशीमध्ये प्रचंड त्रास होतो. चिकनगुनीयामुळे ज्या प्रमाणे पूर्ण थकवा येतो, तशाच प्रकारची लक्षणे ह्यव्हायरल मायोसायटिसह्ण आजाराची असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मुलांना या आजारापासून वाचविण्यासाठी सकस आहारासोबतच त्यांच्यात व्हिटॅमीन सी असणे आवश्यक असून, बालकांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.ह्यव्हायरल मायोसायटिसह्णचा मुलांना प्रचंड त्रास सुरू असून खासगीसह शासकीय रुग्णालयांमध्ये या आजारचे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत.

Web Title: Viral microsatitis risk of children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.