गावठी हातभट्टीचालक एक वर्षासाठी स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:40+5:302021-05-07T04:19:40+5:30

अकोला : गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या मुर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथील रहिवासी अशफाक शहा जुरावर शहा (४०) याला एमपीडीए ...

Village handloom operator located for one year | गावठी हातभट्टीचालक एक वर्षासाठी स्थानबद्ध

गावठी हातभट्टीचालक एक वर्षासाठी स्थानबद्ध

अकोला : गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या मुर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथील रहिवासी अशफाक शहा जुरावर शहा (४०) याला एमपीडीए ॲक्टनुसार एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. कुरुम येथील रहिवासी अशफाक शहा जुरावर शहा याच्यावर यापूर्वी अवैध गावठी दारूची निर्मिती, दारूची वाहतूक तसेच अवैध गावठी दारूची विक्री केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपीवर यापूर्वी विविध कलमांनुसार प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली होती. परंतु, या कारवाईचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी या प्रस्तावाची सर्व कायदेशीर पडताळणी करुन आरोपीला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशावरून आरोपीला गुरुवारी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापूर विभाग संतोष राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, मंगेश महल्ले, माना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय खंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल जोशी, नंदू टिकार, नीलेश इंगळे यांनी केली.

Web Title: Village handloom operator located for one year