विज्युक्टाचा अधिकृत उमेदवार नाही

By Admin | Updated: June 2, 2014 01:36 IST2014-06-01T21:08:19+5:302014-06-02T01:36:51+5:30

शिक्षक मतदारसंघ निवडणुक; स्वत:चा अधिकृत उमेदवार उभा न करण्याचा विज्युक्टाचा निर्णय.

Vijucta is not an official candidate | विज्युक्टाचा अधिकृत उमेदवार नाही

विज्युक्टाचा अधिकृत उमेदवार नाही

अकोला : विधान परिषदच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या विज्युक्टाने (विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन) स्वत:चा अधिकृत उमेदवार उभा न करण्याचा निर्णय रविवारी बैठकीत घेतला. मात्र पदाधिकारी आणि सदस्यांनी मतदान करताना सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करावा, असाही निर्णय घेण्यात आला. निवडणुकीतील भूमिका निि›त करण्यासाठी विज्युक्टाची बैठक अमरावती येथे पार पडली. निवडणुकीत भूमिका निश्चित करण्यासाठी विज्युक्टाची रविवारी अमरावती येथे बैठक झाली. या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. अखेर चर्चेअंती निवडणुकीत स्वत:चा अधिकृत उमेदवार न उतरविण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.

*पदाधिकारी, सदस्य मोकळे

विज्युक्टाचे अनेक पदाधिकारी हे शिवाजी शिक्षण संस्थेत कार्यरत असून, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके हे निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत विज्युक्टा अधिकृत उमेदवार उतरविणार नाही, असा निर्र्णय घेतल्याने हे पदाधिकारी आणि सदस्य वैयक्तिक पातळीवर कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आणि मतदान करण्याकरिता मोकळे झाले आहेत. मात्र, या पदाधिकारी आणि सदस्यांना मतदार हे संघटनेच्या नावानेच ओळखतात. अशातच विज्युक्टाचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रा. संजय देशमुख यांनी निवडणूक रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतल्याने हे पदाधिकारी आणि सदस्य आता स्वत:च्या सदस्यासाठी काम करतात की आपल्या जवळच्या उमेदवाराचा प्रचार करतात, हा उत्सुकतेचा विषय राहणार आहे.

Web Title: Vijucta is not an official candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.