विजयप्रकाश सराग यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST2021-08-17T04:25:27+5:302021-08-17T04:25:27+5:30

अकोला : येथील डॉ. विजयप्रकाश सराग (७४) यांचे शनिवारी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी अकोल्याच्या सामान्य ...

Vijay Prakash Sarag passed away | विजयप्रकाश सराग यांचे निधन

विजयप्रकाश सराग यांचे निधन

अकोला : येथील डॉ. विजयप्रकाश सराग (७४) यांचे शनिवारी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी अकोल्याच्या सामान्य रुग्णालयात बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून सेवा दिली आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, मुलगा, जावई, सून, नातवंड असा आप्त परिवार आहे.

----------------

ललिताबाई ठाकरे

मुंडगाव : येथील प्रतिष्ठीत नागरिक हरिभाऊ ठाकरे यांची पत्नी ललिताबाई ठाकरे (५५) यांचे अल्पशा आजाराने दि. १५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, एक मुलगी, नातवंड असा आप्त परिवार आहे.

----------

नारायण पांडे यांचे निधन

बोरगाव वैराळे : येथील रहिवासी, तसेच श्री जागेश्वर विद्यालय वाडेगावचे सेवानिवृत्त शिक्षक नारायण पुंजाजी पांडे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. ते अमरावती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पांडे यांचे वडील होत.

-----------------

Web Title: Vijay Prakash Sarag passed away