अकोला : अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे नगरसेवक विजय अग्रवाल यांची निवड करण्यात आली. झालेल्या निवडणुकीत विजय अग्रवाल यांना एकूण ९ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद फजलू यांना ६ मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत एमआयएम पक्षाचा एक नगरसेवक तटस्थ राहिल्याने मतदानाचे चित्र अधिकच रंगतदार झाले होते. स्पष्ट बहुमत मिळवत विजय अग्रवाल यांनी स्थायी समिती सभापतीपदावर विजय मिळविला.
स्थायी समिती ही महानगरपालिकेच्या आर्थिक व प्रशासकीय निर्णय प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची समिती मानली जाते. त्यामुळे या निवडीकडे राजकीय वर्तुळासह शहराचे लक्ष लागले होते. विजय अग्रवाल यांच्या निवडीमुळे मनपातील सत्ताधारी गटाची आर्थिक निर्णय प्रक्रियेवरील पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.
Web Summary : Vijay Agrawal of BJP secured victory as Chairman of Akola Municipal Corporation's Standing Committee. He received 9 votes against Congress candidate's 6. The win strengthens the ruling party's hold on financial decisions.
Web Summary : भाजपा के विजय अग्रवाल अकोला महानगरपालिका की स्थायी समिति के अध्यक्ष चुने गए। उन्होंने कांग्रेस उम्मीदवार के 6 वोटों के मुकाबले 9 वोट हासिल किए। इस जीत से सत्ताधारी दल का वित्तीय निर्णयों पर नियंत्रण मजबूत हुआ।