शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अकोल्यात उद्या कान-नाक-घसा तज्ज्ञांची विदर्भस्तरीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 8:11 PM

अकोला : असोसिएशन ऑफ ऑटोरिनोलॉरिगोलॉजिस्ट अर्थात कान-नाक-घसा तज्ज्ञ असोसिएशन विदर्भ प्रदेश व अकोला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ४ व ५ नोव्हेंबर रोजी ‘व्हेंटकॉन २0१७’ ही ३७ वी  विदर्भस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘व्हेंटकॉन २0१७’ : आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे होणार मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : असोसिएशन ऑफ ऑटोरिनोलॉरिगोलॉजिस्ट अर्थात कान-नाक-घसा तज्ज्ञ असोसिएशन विदर्भ प्रदेश व अकोला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ४ व ५ नोव्हेंबर रोजी ‘व्हेंटकॉन २0१७’ ही ३७ वी  विदर्भस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असलेल्या या दोन दिवसीय परिषदेत ५0 हजारांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. सतीश जैन, डॉ. अनिल डिक्रूझ व डॉ. के. पी. मोरवाणी आदी डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे. परिषदेचे उद्घाटन शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गृहराज्य मंत्री डॉ.  रणजित पाटील, एमएमसी मुंबईचे कार्यकारी सदस्य डॉ. प्रताप जाधव व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोलाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती अकोला शाखेचे अध्यक्ष डॉ. विजय खेर्डे यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.या परिषदेचा प्रारंभ शनिवारी सकाळी  डॉ. सतीश जैन यांच्या व्याख्यानाने होणार आहे. त्यानंतर डॉ. के. पी. मोरवानी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी या सभागृहात डॉ. सतीश जैन यांचे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन होणार आहे. रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहेत. रविवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता नोंदणीने संमेलनास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर डॉ. एस. एल. जयस्वाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. सतीश जैन हे मार्गदर्शन करणार आहेत. दिवसभर तज्ज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन व इतर कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता या दोन दिवसीय परिषदेचा समारोप करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. परिषदेला विदर्भातील जवळपास १५0 कान-नाक-घसा तज्ज्ञांची उपस्थिती राहणार आहे. परिषदेच्या यशस्वितेसाठी असोसिएशनच्या विदर्भ रिजनचे अध्यक्ष डॉ. नितीन देवस्थळे, सचिव डॉ. समितर चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. सुनील शेंडे यांच्यासह अकोला आयोजन समितीचे डॉ. किरण लढ्ढा, प्रा. डॉ. अपूर्व पावडे, डॉ. पी. एम. नंदवंशी, डॉ. मधुसुदन सराफ, डॉ. अरुण अग्रवाल, डॉ. ज्योती रेंगी, डॉ. मधुकर गुप्ते, डॉ. स्वाती बाइच्वाल, डॉ. चंद्रशेखर छत्रे, डॉ. स्वाती चिमा, डॉ. भावना पाटील, डॉ. संजीव नरखेडे, डॉ. पराग डोईफोडे, डॉ. सोनल मोदी, डॉ. संदीप धाबेकर, डॉ. राम हेडा आदी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य