शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

vidhan sabha 2019 : भाजपचा आमदारांवर विश्वास; काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 11:00 IST

काँग्रेसने रात्री उशिरा यादी घोषीत केली असून त्यामध्ये अकोट, अकोला पूर्व मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अकोल्यातील चारही आमदारांना पुन्हा स्थान देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे, तर शिवसेनेने बाळपूर मतदारसंघात जाहीर केलेल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसने रात्री उशिरा यादी घोषीत केली असून त्यामध्ये अकोट, अकोला पूर्व मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. दरम्यान महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसंग्रामने बाळापूर मतदारसंघावर दावा केला होता; मात्र येथे शिवसेनेने नितीन देशमुख यांची उमेदवारी घोषित केली आहे त्यामुळे शिवसंग्रामचा भ्रमनिरास झाला आहे.अकोल्यातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आ. गोवर्धन शर्मा हे सहाव्यांदा रिंगणात उतरणार असून, अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे तर अकोला पूर्वमध्ये रणधीर सावरकर हे सलग दुसºयांदा निवडणुकीला समोरे जाणार आहेत. मूर्तिजापूर या राखीव मतदारसंघात आ. हरीश पिंपळे यांना तिसºयांदा संधी मिळाली आहे.अकोला पश्चिममधून आ. शर्मा यांना यावेळी थांबविण्यात येईल, अशी अटकळ बांधल्या जात होती; मात्र भाजपाने कुठलीही जोखीम न पत्करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. अकोला पूर्वमधून अपेक्षेप्रमाणेच आ. सावरकरांना संधी मिळाली तर अकोटमधून आ. प्रकाश भारसाकळे यांनी सर्व शक्यतांना धुळीस मिळवित पक्षश्रेष्ठींचा आपल्यावर विश्वास असल्याचे स्पष्ट करीत उमेदवारीवरचा दावा प्रत्यक्षात उतरविला आहे. आ. पिंपळे यांच्या विरोधात शिवसेनेने जाहीरपणे घेतलेल्या भूमिकेनंतर तसेच भाजपामधील अंतर्गत नाराजीचा फटका त्यांना बसेल, अशी शक्यता होती; मात्र त्याचाही फरक पडलेला नाही.मूर्तिजापुरात युती धर्म संकटात?मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपाचे हरीश पिंपळे यांच्या विरोधात उघड भूमिका घेत शिवसेनेने बैठकांचे सत्र सुरू केले होते. युती झाल्यावर हा मतदारसंघ भाजपाला सुटलाच तर पिंपळे यांना सहकार्य न करण्याच्या घोषणा सेनेच्या नेत्यांनी केल्या होत्या त्यामुळे आता सेनेची भूमिका काय, यावरच युती धर्माचे भविष्य ठरणार आहे.

अकोला पूर्व विवेक पारसकर, अकोटमध्ये संजय बोडखेअकोट विधानसभा मतदारसंघातून प्रा.संजय बोडखे व अकोला पूर्व मतदारसंघात विवेक पारसकर यांना उमेदवारी घोषीत केली आहे. हे दोन्ही उमेदवार प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान अकोला पश्चिम व बाळापूर या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारीचा गुंता कायम आहे. बुधवारी दूपार पर्यंत या दोन्ही जागांवरील उमेदवारांची घोषणा होणे अपेक्षीत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस