vidhan sabha 2019 : भाजपचा आमदारांवर विश्वास; काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 11:00 AM2019-10-02T11:00:38+5:302019-10-02T11:00:49+5:30

काँग्रेसने रात्री उशिरा यादी घोषीत केली असून त्यामध्ये अकोट, अकोला पूर्व मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

vidhan sabha 2019: BJP believes in MLAs; Opportunity for new faces of Congress! | vidhan sabha 2019 : भाजपचा आमदारांवर विश्वास; काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी!

vidhan sabha 2019 : भाजपचा आमदारांवर विश्वास; काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अकोल्यातील चारही आमदारांना पुन्हा स्थान देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे, तर शिवसेनेने बाळपूर मतदारसंघात जाहीर केलेल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसने रात्री उशिरा यादी घोषीत केली असून त्यामध्ये अकोट, अकोला पूर्व मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. दरम्यान महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसंग्रामने बाळापूर मतदारसंघावर दावा केला होता; मात्र येथे शिवसेनेने नितीन देशमुख यांची उमेदवारी घोषित केली आहे त्यामुळे शिवसंग्रामचा भ्रमनिरास झाला आहे.
अकोल्यातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आ. गोवर्धन शर्मा हे सहाव्यांदा रिंगणात उतरणार असून, अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे तर अकोला पूर्वमध्ये रणधीर सावरकर हे सलग दुसºयांदा निवडणुकीला समोरे जाणार आहेत. मूर्तिजापूर या राखीव मतदारसंघात आ. हरीश पिंपळे यांना तिसºयांदा संधी मिळाली आहे.
अकोला पश्चिममधून आ. शर्मा यांना यावेळी थांबविण्यात येईल, अशी अटकळ बांधल्या जात होती; मात्र भाजपाने कुठलीही जोखीम न पत्करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. अकोला पूर्वमधून अपेक्षेप्रमाणेच आ. सावरकरांना संधी मिळाली तर अकोटमधून आ. प्रकाश भारसाकळे यांनी सर्व शक्यतांना धुळीस मिळवित पक्षश्रेष्ठींचा आपल्यावर विश्वास असल्याचे स्पष्ट करीत उमेदवारीवरचा दावा प्रत्यक्षात उतरविला आहे. आ. पिंपळे यांच्या विरोधात शिवसेनेने जाहीरपणे घेतलेल्या भूमिकेनंतर तसेच भाजपामधील अंतर्गत नाराजीचा फटका त्यांना बसेल, अशी शक्यता होती; मात्र त्याचाही फरक पडलेला नाही.
मूर्तिजापुरात युती धर्म संकटात?
मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपाचे हरीश पिंपळे यांच्या विरोधात उघड भूमिका घेत शिवसेनेने बैठकांचे सत्र सुरू केले होते. युती झाल्यावर हा मतदारसंघ भाजपाला सुटलाच तर पिंपळे यांना सहकार्य न करण्याच्या घोषणा सेनेच्या नेत्यांनी केल्या होत्या त्यामुळे आता सेनेची भूमिका काय, यावरच युती धर्माचे भविष्य ठरणार आहे.


अकोला पूर्व विवेक पारसकर, अकोटमध्ये संजय बोडखे
अकोट विधानसभा मतदारसंघातून प्रा.संजय बोडखे व अकोला पूर्व मतदारसंघात विवेक पारसकर यांना उमेदवारी घोषीत केली आहे. हे दोन्ही उमेदवार प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान अकोला पश्चिम व बाळापूर या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारीचा गुंता कायम आहे. बुधवारी दूपार पर्यंत या दोन्ही जागांवरील उमेदवारांची घोषणा होणे अपेक्षीत आहे.

Web Title: vidhan sabha 2019: BJP believes in MLAs; Opportunity for new faces of Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.