विदर्भ टेनीस बॉल क्रिकेट संघात वाशिमचा डंका!
By Admin | Updated: September 20, 2014 00:47 IST2014-09-20T00:45:50+5:302014-09-20T00:47:14+5:30
वाशिम जिल्ह्यातील १३ खेळाडूंचा समावेश; आठ खेळाडू रिसोड तालुक्याचे.

विदर्भ टेनीस बॉल क्रिकेट संघात वाशिमचा डंका!
शिखरचंद बागेरचा/वाशिम
विदर्भ टेनीस बॉल क्रिकेट संघाच्या निवडीत वाशिमचा डंका वाजला आहे. वाशिम जिल्ह्याच्या तब्बल १३ खेळाडूंचा विदर्भाच्या संघात समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये रिसोड तालुक्यातील एकट्या हराळ गावचे आठ खेळाडू आहेत, हे विशेष.
विदर्भ टेनीस बॉल क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड होण्याचा बहुमान हराळ येथील संदीप सरकटेला मिळाला आहे. २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान लखनौ येथील के. डी. सिंग बाबू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑल इंडीया अँण्ड इंटरनॅशनल टी- २0 टेनीस बॉल क्रिकेट कॅश फाईन मनी टुर्नामेंटमध्ये विदर्भाचा संघ सहभागी होणार आहे. त्यामध्ये विदर्भाच्या संघाकडून निवड झालेल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. नागपूर येथील विदर्भ टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी राजकूमार कैथवास यांनी विदर्भ संघाची घोषणा केली आहे. त्यामध्ये हराळ येथील संदीप सरकटेचा कर्णधार म्हणून समावेश आहे. निवड झालेल्या इतर खेळाडूंमध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील प्रशांत खैरे, याच तालुक्यातील हराळ येथील महादा अंभोरे, सागर सरकटे, विठ्ठल गव्हाणे, मुरलीधर बागडे आणि नवनाथ भिंगे, वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सुनिल फूकरे, वाशिम येथील अविनाश परळकर, पंचाळा येथील सत्यपाल इंगोले, कोयाळा येथील विठ्ठल शिंदे, विळेगाव येथील अजय वाकूडकर, तसेच शेलगाव इंगोले येथील शुभम इंगोले या खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे व्यवस्थापक म्हणून रविकूमार वानखेडे रिसोड यांची, तर कोच म्हणून राजेंद्र सौदागर यांची निवड करण्यात आली आहे. विदर्भ टेनीस बॉल क्रिकेट संघाची धूरा पहिल्यांदाच वाशिम जिल्ह्याच्या खांद्यावर आली आहे. या संधीचे सोने करुन वाशिम जिल्ह्यातील खेळाडू आपले नाव उंचावतील, असा विश्वास क्रिकेटप्रेमी व्यक्त करीत आहेत. लखनौ येथे २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान होणार्या टेनिस बॉल क्रिकेट टी-२0 स्पर्धेचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या स्पोर्ट चॅनलवर होणार असल्याने, या खेळाडूंना प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळाणार आहे.