शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

विदर्भात २६ जुलैपासून तीन दिवस पावसाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 16:14 IST

अकोला : विदर्भात येत्या २६ ते २८ जुलैपर्यंत तीन दिवस चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.

- राजरत्न सिरसाट

अकोला : विदर्भात येत्या २६ ते २८ जुलैपर्यंत तीन दिवस चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. हा वर्तविण्यात आलेला अंदाज आशादायक असला तरी यावर्षी पावसाचा दीर्घ खंड पडल्याने विदर्भासह राज्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाने तातडीची बैठक घेऊन नवीन आपात्कालीन पीक नियोजन केले.राज्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने बऱ्यापैकी मान्सूनचा अंदाज वर्तविला होता. तथापि, यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. राज्यात पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला. कोकणात सर्वच जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली; परंतु उर्वरित मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्टÑात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. विदर्भातील बहुतांश भागात दमदार पाऊसच झाला नसल्याने हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मे महिन्यात रोहिणी नक्षत्र सुरू झाले. ७ जून रोजी पावसाळा सुरू झाला. तथापि, २३ जूनपर्यंत शेतकºयांना मान्सूनची प्रतीक्षा करावी लागली. तेव्हापासून पावसाचा सारखा खंड पडत असून, विदर्भात अनेक भागात पेरण्या उलटल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील पिकांवर याचा जास्त परिणाम झाला आहे.पावसाच्या या अनियमिततेच्या अनुषंगाने कृषी आयुक्तालय पुणे येथे मंगळवार,२२ जून रोजी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे हैद्राबाद येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ के.व्ही.राव, डॉ.के. गोपीनाथ, राज्यातील कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, कृषी संचालक विजय घावट, आत्माचे संचालक अनिल बनसोडे, राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती. येथे जिल्हावार पाऊसमान व पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, तसेच ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या नाहीत त्यांच्यासाठी ३१ जुलै व त्यानंतर १ ते १५ आॅगस्ट आणि १६ ते ३१ आॅगस्टपर्यंत शेतकºयांनी कोणती पिके घ्यावीत, याचे आपात्कालीन पीक नियोजन करण्यात आले.

 

मान्सूनचे वारे पूर्वेकडून पश्चिमकडे वाहत असून, हे पावसासाठीचे चांगले संकेत मानण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या २६ ते २८ जुलै रोजी विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.डॉ. आर.एन.साबळे,ज्येष्ठ कृषी हवामान शस्त्रज्ञ, पुणे.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भAkolaअकोलाRainपाऊसweatherहवामान