शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात विदर्भ केसरी स्व.ब्रजलाल बियाणी यांना आदरांजली

By atul.jaiswal | Updated: December 6, 2017 18:58 IST

अकोला: जेष्ठ स्वातंत्र सेनानी,घटना समितीचे सदस्य व थोर विदर्भवादी स्व.ब्रजलाल बियाणी यांच्या १२१ व्या जयंती दिनी त्यांना शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था,संघटनांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. 

ठळक मुद्दे गांधी जवाहरलाल बाग येथील स्व.भाईजींच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर सोहळा

अकोला: जेष्ठ स्वातंत्र सेनानी,घटना समितीचे सदस्य व थोर विदर्भवादी स्व.ब्रजलाल बियाणी यांच्या १२१ व्या जयंती दिनी त्यांना शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था,संघटनांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. बुधवारी सकाळी  गांधी जवाहरलाल बाग येथील स्व.भाईजींच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर माहेश्वरी समाज ट्रस्ट, जिल्हा पत्रकार संघ, प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष रमेश चांडक, नगरसेविका  उषा वीरक,बीजीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ.आर.बी.हेडा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब, प्रेस क्लब चे प्रा. सुभाष गदिया, विदर्भ चेंबर चे पुरुषोत्तम खटोड आदी मान्यवर उपस्थित होते.स्व. भाईजींच्या प्रतिमेला हारार्पण व आदरांजलीने सोहळ्याचा प्रारंभ झाला. यावेळी डॉ.हेडा यांनी स्व. भाईजींच्या जीवनावर प्रकाश टाकला.ते म्हणाले महामानव हे राष्ट्राचे नेते असतात ,ते सर्व समाज व राष्ट्राला प्रगतीवर घेऊन जात असतात; मात्र आपण महामानवांना आपापल्या जातीत वाटून त्यांची उंची खुजी करण्याचा प्रयत्न चालविला आहे.यावेळी राजाभाऊ देशमुख, प्रभाकर पाटणकर,मोहनलाल नथ्थानी, शंकरलाल बियाणी, अ‍ॅड.एस.एस.ठाकूर, सुरेश मुंदडा, डॉ.अनिल तोष्णीवाल, रमेश बांगड, ओमप्रकाश चरखा, विनायक पांडे ,चौथमल सारडा, विनीत बियाणी, अरविंद सोनी, नारायण भाला, अजय तापडिया, अजय बियाणी, चंद्रकांत कुलकर्णी, वामनराव थोटांगे, हरीश मानधने, सुरेश काबरा, माजी भाजप महानगरध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे,दीपक मायी,हरीशभाई अलिमचंदानी, आशिष पवित्रकार,नारायण घनगाव, कमलकिशोर शर्मा, नरेंद्र तापडिया, जयप्रकाश चांडक, नरेश बियाणी, केशव खटोड ,विजय रांदड, राधेशाम भंसाली,रमनभाई लाहोटी, प्रा.सत्यनारायण बाहेती, नरेंद्र भाला, राजेंद्र चितलांगे,सुरज काबरा, मनोज रांदड, शैलेश तोष्णीवाल, जय बांगड,संदेश रांदड, कमलकिशोर बियाणी, दीपक तोष्णीवाल,गोविंद सारडा,मनीष तिवारी,अरुण कोठारी, संजय चौधरी. प्रा.राम बाहेती, सागर लोहिया, अड.विशाल लढ्ढा,पियुष मालाणी,वासुदेव दहीकर,जे.एस.चौहान, गोविंद राठी, नंदकिशोर चांडक,बाबुराव देशमुख ,अतुल चौधरी,पंकज मणियार,सौ.अन्नपूर्णा राठी, सौ.वंदना हेडा,सौ.लीलादेवी जाजू, कु.राधिका लाहोटी,प्राजक्ता हेडा समवेत, माहेश्वरी समाज ट्रस्ट ,विदर्भ चेंबर,जिल्हा पत्रकार संघ,प्रेस क्लब,जेष्ठ नागरिक संघ,माहेश्वरी प्रगती मंडळ,माहेश्वरी नवयुवती मंडळ, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ ,माहेश्वरी प्रगती मंडळ, जिल्हा माहेश्वरी संघटन ,तहसील माहेश्वरी संघटन, माहेश्वरी युवा संघटन ग्रंथालय संघ, माहेश्वरी महासभा,दाल मिल असो.एमआयडीसी प्लॉट मालक संघ ,सेवाश्री, नारायण सेवा संस्थान ,इंटक ,भाजप अनु.जाती मोर्चा, फेसकाम ,सराफ असो. श्रीराम समूह, रामदेवबाबा समिती, रेडक्रॉस ,सालसार भजन मंडळ,सद्गुरू परिवार,उद्योग आघाडीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Akola cityअकोला शहरGandhi-Jawahar Baghगांधी-जवाहर बाग