शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 12:39 PM

Ram Jadhav passed away :

अकोला : ज्येष्ठ रंगकर्मी, रत्नागिरी येथे झालेल्या नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, रंगभूमी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष वअकोला भूषण राम जाधव यांचे आज दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्राचा चालता, बोलता विश्वकोष हरविला असून मागील ५ दशकांपासून अकोल्याची नाट्य चळवळ प्रभावित ठेवणाऱ्या या जातीवंत कलावंताने जीवनाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली आहे. मृत्यसमयी मामांचे वय ८७ वर्ष होते.

अगदी लहानपणापासूनच राम जाधव यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. लहान -मोठ्या भूमिका साकारत त्यांनी आपली चुणूक दाखविली. पुढे महाविद्यालयीन जीवनात देखील त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. नंतरच्या काळात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच रंगभूमीच्या चरणी बहाल केले. रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी करीत असताना दुसरीकडे रंगभूमीवर मामांची भूमिका वठविणे सुरूच होते. प्रायोगिक रंगभूमीला सन्मान मिळवून देण्याचे काम मामांनी केले. रंगभूमीला व्यवसाय न मानता पूजा मानणारे मामा होते.

मामांनी अभिनया सोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणून देखील आपली छाप पाडली. मामांच्या कार्याची दखत घेत राज्यशासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. २०११ मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद राम जाधव यांनी भूषविले. हा अकोलेकरांसाठी फार मोठा सन्मान होता. जीवनभर सतत नाटक आणि नाटक हाच ध्यास घेतलेला हा कलावंत गेल्याने अकोल्याच्या नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अकोल्यात सुसज्ज नाट्यगृह असावे हे मामांचे स्वप्न होते. ते अधुरे राहिले आहे.

टॅग्स :Marathi Natya Sammelanमराठी नाट्य संमेलन