शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...
3
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
4
३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी
5
गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!
6
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
7
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
8
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
9
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
10
३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
11
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
12
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
13
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
14
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
15
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
16
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
17
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
18
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
19
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
20
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 

अमरावती विभागातील माध्यमिकच्या विशेष शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:28 PM

अकोला: अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रांची शासनाच्या आदेशानुसार विभागनिहाय पडताळणी करण्यात येत आहेत.

अकोला: अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रांची शासनाच्या आदेशानुसार विभागनिहाय पडताळणी करण्यात येत आहेत. शिक्षण संचालनालयाच्या चार विशेष पथकांनी अकोल्यात पाच ते सहा दिवस राहून अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील विशेष शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यातील १00 व अकोला जिल्ह्यातील २८ शिक्षकांचा समावेश आहे. यासंदर्भातील अहवाल विशेष पथकांचे अधिकारी शासनाकडे सादर करणार आहेत.इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने २00९ मध्ये देशभरामध्ये अपंग समावेशित शिक्षण योजना सुरू केली. या योजनेसाठी शासकीय माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये संस्थेच्या माध्यमातून विशेष शिक्षक व परिचरांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्ती करताना, शैक्षणिक पात्रतेसह, जात प्रमाणपत्र, आरक्षणाचा विचार करण्यात आला की नाही, यात काही घोळ तर झाला नाही ना, असा संशय येत असल्यामुळे शासनाने राज्यात अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत नियुक्त विशेष शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रांची विभागनिहाय पडताळणी सुरू केली आहे. अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील विशेष शिक्षकांना अकोल्यात बोलावून त्यांची एका अज्ञात ठिकाणी चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यासाठी शिक्षण विभागाला वेळापत्रक देण्यात आले होते. अकोल्यात शिक्षण संचालनालयाच्या चार विशेष पथकांनी २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत पडताळणी केली. (प्रतिनिधी)यात कोणी बोगस शिक्षकाची नियुक्ती झाली आहे का, नियुक्तीदरम्यान काही घोळ झालेला आहे, याची तपासणी विशेष पथकांच्या माध्यमातून करण्यात आली. याबाबत तपशीलवार माहिती देता येणार नाही.-अंबादास पेंदोर, शिक्षण उपसंचालकअमरावती विभाग.

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीTeacherशिक्षक