आता झटक्यात वाळतील भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती !

By Admin | Updated: October 22, 2014 18:23 IST2014-10-21T23:46:41+5:302014-10-22T18:23:11+5:30

डॉ.पदेकृविने केले सोलर टनेल ड्रायर विकसीत.

Vegetables, fruits, herb! | आता झटक्यात वाळतील भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती !

आता झटक्यात वाळतील भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती !

अकोला : फळे, भाजीपाला, औषधी वनस्पतीवर प्रकिया करण्यासाठी आता वेळ लागणार नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भाजीपाला वाळवणीसाठी सोलर टनेल ड्रायर यंत्र विकसीत केले असून, या संयत्राच्या वापरातून गृह उद्योग निर्मिती व्हावी, यावरही कृषी विद्यापीठाकडून भर दिला जात आहे.
कृषी उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी कृषी उत्पादने वाळवावी लागतात. धान्य, भाजीपाला, फळे उघड्यावर सुर्यप्रकाशात वाळविण्याची पुर्वापार पध्दत आहे. या पारंपरिक पध्दतीने कृषी उत्पादनाची नासाडी तर होतेच; शिवाय, पदार्थांचा रंग, चव व गुणवत्ता कायम राहत नाही. याचा विचार करू न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत प्रकल्पातंर्गत कार्यरत असलेल्या अपारंपरिक उर्जास्त्रोत विभागाच्या शास्त्रज्ञांनी सोलर टनेल ड्रायर विकसीत केले आहे. या सौर उर्जा वाळवणी यंत्रामधून महागडी पिके म्हणजेच औषधी वनस्पती, सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद इत्यादीसह मिरची, आवळा कँडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला, तसेच फळं वाळवता येते. या ड्रायरची कृषी उत्पादने वाळविण्याची क्षमता १00 किलो एवढी आहे. या ड्रायरमध्ये सुर्याची अतिनिल किरणे आत शिरत नसल्याने पदार्थांची चव, रंग व गुणवत्ता टिकूण राहण्यास मदत होत असून, वेळेची बचत होते.
गुणवत्ता व जिवनसत्वे टिकवून ठेवणारे सोलर टनेल ड्रायर विकसीत करण्यात आले आहे. कृषी, गृह व व्यावसायिक प्रतिष्ठाणांसाठी ते फायदेशीर असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन अभियंता डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी नमूद केले.

* गृह उद्योगाला उत्तम पर्याय
या संयत्राचा वापर मोठय़ा व्यावसायीक प्रतिष्ठानासह कृषी व गृह उद्योगासाठी चांगल्या पध्दतीने करता येतो. फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती सुकविण्याकरीता व त्याची गुणवत्ता वाढविण्याकरीता हे सोलर टनेल ड्रायर उत्तम पर्याय आहे.

* सोलर टनेल ड्रायरची वैशिष्टे
ड्रायरला विविध आकाराची सरंचना देता येते.
स्थानिक साहित्यातून तयार करता येते.
उभारणीचा खर्च केवळ ४0 हजार रूपये.

*ड्रायरचे फायदे
इंधन, वीज आणि वेळेची बचत
गुणवत्ता टिकून राहते
जीवनसत्वाचे प्रमाण कायम राहते.

Web Title: Vegetables, fruits, herb!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.