शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
4
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
5
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
6
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
7
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
8
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
9
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
10
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
11
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
12
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
13
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
14
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
15
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
16
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
17
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
18
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
19
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
20
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’ची मते वाढली; पण विजयाचा बुरूज ढासळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 14:18 IST

गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यात ‘वंचित’ची मते वाढली असली तरी एकही आमदार निवडून आला नसल्याने, विजयाचा बुरूज मात्र ढासळला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत २५ वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील एक-दोन मतदारसंघात भारिप बहुजन महासंघाने (वंचित बहुजन आघाडी) विजय मिळविला आहे; मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यात ‘वंचित’ची मते वाढली असली तरी एकही आमदार निवडून आला नसल्याने, विजयाचा बुरूज मात्र ढासळला आहे.गत १९९४ ते २०१४ या २५ वर्षांच्या कालावधीत झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये भारिप बहुजन महासंघाने (वंचित बहुजन आघाडी) जिल्ह्यातील एक ते दोन मतदारसंघात विजय मिळविला. त्यामुळे सतत २५ वर्षे जिल्ह्यात या पक्षाचे एक-दोन आमदार राहिले आहेत. त्यामध्ये १९९४ मध्ये मूर्तिजापूर मतदारसंघातून मखराम पवार, १९९९ मध्ये बोरगाव मंजू मतदारसंघातून डॉ. डी. एम. भांडे व अकोट मतदारसंघातून रामदास बोडखे, २००४ मध्ये बोरगाव मंजू मतदारसंघातून हरिदास भदे, २००९ मध्ये अकोला पूर्व मतदारसंघातून हरिदास भदे व बाळापूर मतदारसंघातून बळीराम सिरस्कार आणि २०१४ मध्ये बाळापूर मतदारसंघातून बळीराम सिरस्कार विजयी झाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला विजय मिळविता आला नाही. अकोट, बाळापूर, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या चार मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी अटीतटीची लढत देत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये ५५ हजार ६५८ मतांची वाढ झाली असून, गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत १२ हजार ९६ मतांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची मते वाढली असली तरी गत २५ वर्षांनंतर या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ‘वंचित’चा एकही आमदार निवडून आला नसल्याने, विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा बुरूज मात्र ढासळल्याचे वास्तव आहे.२०१४ च्या निवडणुकीतअशी मिळाली होती मते!४२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत भारिप बहुजन महासंघाला (वंचित बहुजन आघाडी) १ लाख ९० हजार २७९ मते मिळाली होती.४त्यानंतर गत लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला २ लाख ३३ हजार ८४१ मते मिळाली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पाचही मतदारसंघांत ‘वंचित’ला २ लाख ४५ हजार ९३७ मते मिळाली.गत विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्ये वाढ झाली. अपेक्षेप्रमाणे विजय मिळाला नसून, पाचही मतदारसंघांत पराभव झाला. त्यामध्ये अकोट, बाळापूर, अकोला पूर्व व मूर्तिजापूर चार मतदारसंघांत महाआघाडीमुळे वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला आहे.-राजेंद्र पातोडे,प्रदेश प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी.

 

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019