प्लॉट हिस्से वाटणीच्या वादातून घरात घुसून वहिनीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:25+5:302021-05-06T04:20:25+5:30

येथील सराफा बाजारातील रहिवासी दीर व भावजय यांच्यात ३ मे रोजी रात्री प्लॉट हिस्से वाटणीवरून वाद झाला. दिराने ...

Vahinis breaks into house due to dispute over allotment of plot parts | प्लॉट हिस्से वाटणीच्या वादातून घरात घुसून वहिनीस मारहाण

प्लॉट हिस्से वाटणीच्या वादातून घरात घुसून वहिनीस मारहाण

येथील सराफा बाजारातील रहिवासी दीर व भावजय यांच्यात ३ मे रोजी रात्री प्लॉट हिस्से वाटणीवरून वाद झाला. दिराने भावजयीचे घरात घुसून तिच्याशी वाद करून मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

शीला ओमप्रकाश पाड\िया (५३) राहणार सराफा बाजार तेल्हारा यांच्या तक्रारीनुसार आरोपी विक्रम पूनमचंद पाडिया, राहणार सराफा बाजार तेल्हारा हा नेहमी फिर्यादीसोबत तिच्या सासूच्या नावाने असलेल्या प्लॉटचे हिस्से वाटणीवरून वाद घालतो. मारहाण करतो. फिर्यादीची मुलगी शिक्षणासाठी अकोला राहात असल्याने फिर्यादीचे पतीसुद्धा अकोला येथे राहतात. त्यामुळे ती तेल्हारा येथे घरी एकटीच राहते. फिर्यादीचा दीर विक्रम पाडिया घराशेजारीच राहतो. घटनेच्या दिवशी ३ मे रोजी रात्री आरोपी दीर तिच्या घरात घुसला व वाद करून शिवीगाळ केली. पोलिसांनी आरोपीवर भादंवि कलम ४५२,३२४,५०४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुरेश काळे करीत आहेत.

Web Title: Vahinis breaks into house due to dispute over allotment of plot parts