व-हाडातील कपाशी पिकावर वाढतोय लाल्याचा प्रकोप!

By Admin | Updated: September 18, 2014 02:39 IST2014-09-18T02:30:41+5:302014-09-18T02:39:31+5:30

प्रतिकूल हवामान, अन्नद्रव्याची कमतरता; कापूस पिकावर कोकडा व लाल्याने आक्रमण केले आहे.

Vaginal incubation crop growing on the crop! | व-हाडातील कपाशी पिकावर वाढतोय लाल्याचा प्रकोप!

व-हाडातील कपाशी पिकावर वाढतोय लाल्याचा प्रकोप!

अकोला- अगोदरच जिल्ह्यातील कापसाचा पेरा घटला, त्यात प्रतिकूल हवामान, अन्नद्रव्याची कमतरता, यामुळे कापूस पिकावर कोकडा व लाल्याने आक्रमण केले. हा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास जवळपास ६0 टक्के कापसाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने अगोदरच लहरी पावसाच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्नात असलेल्या शे तकर्‍यांसमोर लाल्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
कापूस दरवर्षी दगा देतोच हा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. म्हणूनच, यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीनला पसंती दिली आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत कापसाचे प्रमाण वाढले आहे. तथापि यावर्षी सुरुवातीला पाऊस नसल्याने कापूस पेरणीला विलंब झाला. त्याचा परिणाम कापसाच्या उगवणशक्ती व आरोग्यावर होत आहे. यातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाचा पुन्हा लाल्याने तोंड वर काढले असून, कीटकनाशकांचा खर्च वाढत असल्याने आधीच कर्ज फेडीच्या संकटाचा सामना करणार्‍या या शेतकर्‍यांसमोर नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पश्‍चिम विदर्भातील कापूस पिकावर सुरुवातीला कोकडा येत असून, त्याचे रू पांतर नंतर लाल्यात होत आहे. सध्या हे प्रमाण कमी असले तरी अनेक वर्षाच्या अनुभवामुळे शेतकरी धास्तावला आहे. रसशोषण करणार्‍या किडीच्या प्रादुर्भावामुळे लाल्या होत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणण्यानुसार, हा रोग कापूस वेचणी सुरू असेल, यामुळे कापसाचे पाने लाल होतात, नंतर ते सुकू लागतात. याचा फटका बसल्यास उत्पादनात घट होत असते.
डॉ.पंदेकृविचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र गाडे यांनी कापूस फुलोर्‍यावर येत असताना लाल पाने झाली तर उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादनात१0 ते ६0 टक्के एवढी घट होत असल्याचे सांगीतले. त्यावर उपाय म्हणुन कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगीतले.

Web Title: Vaginal incubation crop growing on the crop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.