दोन दिवसात गर्भवतींच्या लसीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST2021-07-17T04:16:18+5:302021-07-17T04:16:18+5:30
जुने शहरात नाले बांधकामाला वेग अकोला : सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून, या दिवसात नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहू लागते. ...

दोन दिवसात गर्भवतींच्या लसीकरणास सुरुवात
जुने शहरात नाले बांधकामाला वेग
अकोला : सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून, या दिवसात नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहू लागते. सध्या जुने शहरातील बाळापूर रोड, डाबकी रोड परिसरातील काही भागात नाले बांधकामाला वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या भागातील सांडपाणी रस्त्यावर साचणार नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा पुरवठा
अकोला : राज्यभरात कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी आवश्यक लसीचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात मर्यादित लसीकरण केले जात आहे. जिल्ह्याला होणारा लसीचा पुरवठा दोन दिवस पुरेल एवढाच आहे. त्याचा परिणाम लसीकरणाच्या गतीवर होताना दिसून येत आहे.