चतारी लसीकरण केंद्रावर जिल्हाबाहेरील व्यक्तींचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:18 IST2021-05-12T04:18:36+5:302021-05-12T04:18:36+5:30
बाहेरील जिल्ह्यातील नागरिक नियमांचे पालन न करता, लसीकरण केंद्रावर गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. या गंभीर विषयाकडे आरोग्य ...

चतारी लसीकरण केंद्रावर जिल्हाबाहेरील व्यक्तींचे लसीकरण
बाहेरील जिल्ह्यातील नागरिक नियमांचे पालन न करता, लसीकरण केंद्रावर गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. या गंभीर विषयाकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे व नियमानुसार स्थानिक नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. लसीकरण केंद्रावर जिल्ह्यातील व बाहेरील जिल्ह्यातील नागरिक येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेचा वेळ अनेक नागरिकांना माहिती नाही. केंद्रावरही याविषयी संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून माहिती देण्यात येत नसल्याने गोंधळ उडत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनी सायंकाळी सहा ते आठ दरम्यान संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. पातूर प्राथमिक आरोग्य केंद्र, चतारी ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीकरण सुरू आहे.
-डॉ. मनीष शर्मा, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी