अकोट येथे महावितरण कर्मचाऱ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:18 IST2021-05-12T04:18:38+5:302021-05-12T04:18:38+5:30
एप्रिल महिन्यात तालुक्यातील महावितरणच्या ९२ टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला. मुख्य अभियंता अनिल डोहे, अधीक्षक अभियंता ...

अकोट येथे महावितरण कर्मचाऱ्यांचे लसीकरण
एप्रिल महिन्यात तालुक्यातील महावितरणच्या ९२ टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला. मुख्य अभियंता अनिल डोहे, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनानुसार अकोला मंडळ कार्यालयाने ऑनलाईन मार्गदर्शन केले होते. या ऑनलाईन शिबिरात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जुगल चिरानिया यांनी मार्गदर्शन केले. वेबिनारचे संचालन भरत डिक्कर यांनी, आभार अकोटचे उपकार्यकारी अभियंता जी. एस. अग्रवाल यांनी मानले. अकोटचे कार्यकारी अभियंता ए. डी. उईके, डॉ. विजयश्री गुल्हाने, डॉ. योगिनी वाघ, वंदना मेहेरे, नंदा लाथाड, श्रीमती गोगटे, नितीन धुमाळे, आशिष सिंग, सोसान रेड्डी, दीपक भटकर, अमोल माने, चेतन भगत, प्रीती शेलूकार, माधुरी ठाकरे यांनी यासाठी सहकार्य केले.
फोटो: