लसीअभावी एका दिवसासाठी लसीकरण ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST2021-07-26T04:18:36+5:302021-07-26T04:18:36+5:30
कोव्हॅक्सिन दुसऱ्या डोससाठी राखीव जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा तुटवडा असला तरी कोव्हॅक्सिन लसीचे सुमारे दहा हजार डोस उपलब्ध आहेत. या ...

लसीअभावी एका दिवसासाठी लसीकरण ठप्प!
कोव्हॅक्सिन दुसऱ्या डोससाठी राखीव
जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा तुटवडा असला तरी कोव्हॅक्सिन लसीचे सुमारे दहा हजार डोस उपलब्ध आहेत. या लसीचा पुरवठा नियमित होत नसल्याने ती जपून वापरणे सुरू असल्याची माहिती आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे, अशांना दुसरा डोस मिळण्यास अडचण निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही लस दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आज होणार कोविशिल्डचा पुरवठा
सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा तुटवडा आहे. अशातच सोमवारी जिल्ह्याला कोविशिल्डचे सुमारे सात हजार डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्याला सोमवारी लस उपलब्ध हाेताच मंगळवारपासून जिल्ह्यातील लसीकरण मोहीम पुन्हा सुरू होणार आहे.
जिल्ह्याला लसीचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे मंगळवारपासून पुन्हा लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे. कोव्हॅक्सिनचा उपयोग दुसऱ्या डोससाठी केला जात आहे.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, लसीकरण मोहीम, अकोला