अवैध दारू विक्रेत्यांवर उरळ पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST2021-03-29T04:13:06+5:302021-03-29T04:13:06+5:30

पोलिसांनी हाता येथील इंदु गजानन मावळे हिच्या घरातून विदेशी व देशी दारूच्या १५ बाटल्या वासुदेव महादेव सुर्वे रा.हाता ...

Ural police crackdown on illegal liquor dealers | अवैध दारू विक्रेत्यांवर उरळ पोलिसांची कारवाई

अवैध दारू विक्रेत्यांवर उरळ पोलिसांची कारवाई

पोलिसांनी हाता येथील इंदु गजानन मावळे हिच्या घरातून विदेशी व देशी दारूच्या १५ बाटल्या वासुदेव महादेव सुर्वे रा.हाता यांच्याकडून गावठी हातभट्टीची १५ लिटर दारू व ७५ लिटर सडवा मोहा, ग्राम जुना अंदुरा येथे उमेश विष्णु भालेराव याच्या कडुन देशी दारूच्या ६५ बाटल्या, गणेश सुभाष कड रा.जुना अंदुरा याच्याकडुन देशी दारूच्या २० बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी चौघा आरोपींकडून एकूण १३ हजार २३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुध्द दारुबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. ठाणेदार अनंतराव वडतकर यांच्या मार्गदर्शनात पोहवा धनपाल लाटकर, पो.कॉ.शैलेश घुगे, अमर इंगळे, गजानन ठोंब्रे, चेतन पाली, रवी हिंगणे, सोनाली राठोड यांनी कारवाई केली.

फोटो:

Web Title: Ural police crackdown on illegal liquor dealers