जिल्हा क्रीडा अधिकारीपदी उपलवार, कायमस्वरुपी अधिकाऱ्यासाठी क्रीडाप्रेमींचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 16:53 IST2022-09-02T16:43:00+5:302022-09-02T16:53:30+5:30
अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी पद नेहमी प्रभारींच्या खांद्यावर असल्याने क्रीडा प्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारीपदी उपलवार, कायमस्वरुपी अधिकाऱ्यासाठी क्रीडाप्रेमींचा आग्रह
अकोला: जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी पदी गणेश कुलकर्णी हे सेवेतून निवृत्त झाल्याने जिल्हा क्रीडा अधिकारी पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा प्रभारी पदभार चंद्रकांत उपलवार यांना देण्यात आला आहे.
अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी पद नेहमी प्रभारींच्या खांद्यावर असल्याने क्रीडा प्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे. तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्यानंतर प्रभारी पदभार हा गणेश जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर काही महिन्यातच जिल्हा क्रीडा अधिकारी पदी गणेश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता अवघ्या चार महिन्यानंतर ते सेवानिवृत्त झाल्याने पुन्हा जिल्हा क्रीडा अधिकारी पद रिक्त होते. आता जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा प्रभारी पदभार चंद्रकांत उपलवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
कायस्वरूपी अधिकारी द्या!
जिल्हा क्रीडा अधिकारी पद महत्त्वाचे असल्याने या ठिकाणी कायस्वरूपी अधिकारी देण्याची मागणी क्रीडा प्रेमींमधून व्यक्त होत आहे. नवे अधिकारी यांची सुद्धा पाच ते सहा महिन्यात सेवा निवृत्त होत असल्याची माहिती आहे, त्यामुळे पुन्हा हे पद रिक्त होण्याची शक्यता आहे.