अज्ञात इसमाने शेतीचे साहित्य जाळले!
By Admin | Updated: May 19, 2017 20:04 IST2017-05-19T20:04:48+5:302017-05-19T20:04:48+5:30
अंदुरा : येथे अज्ञात इसमाकडून लावण्यात आलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर पाइप, तर दोन शेतकऱ्यांची केबल चोरीची घटना १९ मे रोजी पहाटे ४ वाजताचे दरम्यान घडली.

अज्ञात इसमाने शेतीचे साहित्य जाळले!
लोकमत न्यूज नेटवर्क
अंदुरा : येथे अज्ञात इसमाकडून लावण्यात आलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर पाइप, तर दोन शेतकऱ्यांची केबल चोरीची घटना १९ मे रोजी पहाटे ४ वाजताचे दरम्यान घडली. या घटनेमध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
तळेगाव (डवला) शेतशिवारात असलेल्या अंदुरा येथील अल्पभूधारक शेतकरी बेलाबाई भगतसिंग राजपूत यांच्या गट नं. १७ मधील शेतात ठेवलेल्या ३० स्प्रिंकलर पाइप व तीन एकरातील ठिंबक सिंचनाच्या नळ्या, तर शेतकरी ध्रुपदाबाई रामभाऊ चितोडे यांच्या गट नं. १८ मधील यांचे २७ स्प्रिंकलर पाइप यांच्यावर अज्ञात इसमाकडून शेतातील काडीकचरा टाकून आग लावण्यात आली. तसेच गट नं. १९ मधील शेतकरी सुरेश वासुदेव बोरवार व शेतकरी सुनील वासुदेव वानखडे यांच्या शेतातील २४० फूट केबलची चोरी करण्यात आली. या घटनेमध्ये शेतकऱ्यांचे दीड लाखांचे नुकसान झाले. सदर घटनेतील शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. तसेच या परिसरात नेहमीच होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.