शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेच्या  'गोल्डन कार्ड'चे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 6:38 PM

अकोला :-प्रधानमंत्री आयुष्यमान भारत या योजनेचे लाभार्थ्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास , माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये गोल्डन कार्डचे वाटप करण्यांत आले.

अकोला :-प्रधानमंत्री आयुष्यमान भारत या योजनेचे लाभार्थ्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास , माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये गोल्डन कार्डचे वाटप करण्यांत आले.यावेळी आमदार रणधिर सावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे , औरंगाबाद येथील नायलेट यंत्रणेचे प्रमुख संजीव गुप्ता, सीएससी केंद्राचे राज्य प्रमुख वैभव देशपांडे , प्रधानमंत्री जन आरोग्य योजना डॉ. अश्विनी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे पुढे म्हणाले की, कोणतेही काम सुरू झाल्यावर अडचणी येत असतात. आपण केलेले काम कौतुकास्पद आहे. सर्वानी जबाबदारीने काम करायला पाहीजे असे प्रतिपादन संजय धोत्रे यांनी केले.आमदार रणधिर सावरकर आपल्या मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आयुष्यमान भारत योजनेचे काम जिल्हयात पारदर्शक होत आहे. त्याला पाठबळ देण्याचे आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आयुष्यमान भारत योजनेच्या काही लाभार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते गोल्डन कार्डचे वितरणही करण्यात आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रधानमंत्री आयुष्यमान भारत या योजनेबाबत मार्गदर्शन केले. सदर योजना संपुर्ण ग्रामीण भागापर्यंत पोहचून त्याचा लाभ सर्व जणांना मिळणे आवश्यक आहे. सर्वात जास्त काम आशा वर्कर्स करतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन ‍मिळत नाही . त्यांना मानधन कसे मिळणार याचा प्रयत्न करणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले. आयुष प्रसाद यांनी अकोला येथे आयटी पार्क सुरू करण्यासाठी सादरीकरण केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तत्पुर्वी,  केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात ग्रामपंचायत संबंधी आढावा बैठक घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व योजनेचे मार्गदर्शन डॉ. अश्विनी खडसे यांनी केले तसेच संचालन व आभार प्रदर्शन प्रिती शिंदे यांनी केले.

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेAkolaअकोलाayushman bharatआयुष्मान भारत