केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कच्छी मेमन जमातला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST2021-05-23T04:17:59+5:302021-05-23T04:17:59+5:30

जीवघेण्या काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कमी न हाेता दिवसेंदिवस वाढल्याचे चित्र आहे. या महामारीत सगळीकडे राजकारण केले जात असताना केंद्रीय ...

Union Minister Nitin Gadkari's help to Kutchi Memon tribe | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कच्छी मेमन जमातला मदत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कच्छी मेमन जमातला मदत

जीवघेण्या काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कमी न हाेता दिवसेंदिवस वाढल्याचे चित्र आहे. या महामारीत सगळीकडे राजकारण केले जात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समाजकारणावर भर देत असल्याचे पाहावयास मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विदर्भातील रुग्णसंख्या लक्षणीय वाढल्याने वैद्यकीय आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. अशास्थितीत अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व बेडची संख्या ताेकडी पडत असून, काही रुग्णांलयांमध्ये चक्क औषधीचा साठा नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़ अशावेळी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री गडकरी सर्वतोपरी मदत करीत आहेत. नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांतील आरोग्य सुविधांवर त्यांचे लक्ष आहे.

मेमन जमातच्या उपक्रमाची घेतली दखल

मागील वर्षभरापासून कच्छी मेमन जमात या मुस्लिम समाजसेवी संघटनेकडून सर्वधर्मातील काेराेनाबाधित मृतदेहांवर निशुल्क अंत्यसंस्कार केले जात आहेत. संघटनेच्या कार्याची दखल घेत नितीन गडकरी यांनी संस्थेचे अध्यक्ष जावेद जकारिया यांना नागपुरात बोलावून अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची भेट दिली.

अशा संकटसमयी सर्वधर्मीय समाजाप्रती असलेली तळमळ व कार्य बघून माननीय नितीन गडकरी यांनी आमच्या संस्थेला अत्यावश्यक वैद्यकीय वस्तूंची भेट दिली. संस्था त्यांची कायम ऋणी राहील.

- जावेद जकारिया, अध्यक्ष, कच्छी मेमन जमात अकाेला

Web Title: Union Minister Nitin Gadkari's help to Kutchi Memon tribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.