अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक : एक ठार; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 18:39 IST2020-06-05T18:37:27+5:302020-06-05T18:39:44+5:30
अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक : एक ठार; एक गंभीर
दिग्रस बु : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना दिग्रस खुर्द ते बाभूळगाव शुक्रवारी दुपारी घडली.
तांदळी येथील दोघे जण बाभूळगाववरून वाडेगावकडे दुचाकी क्रमांक एमएच ३० एसी १८५७ ने जात होते. दिग्रस खुर्द ते बाभूळगावदरम्यान त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये देवीदास पाकदुणे (६०) हे जागीच ठार झाले तर नीलेश साबळे हे गंभीर जखमी झाले. नीलेश साबळे यांना तत्काळ पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. या अपघाताबाबत माहिती मिळताच बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी साळुंके व पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. तांदळी येथील राणा विष्णू डाबेराव व बाभूळगाव येथील युवा कार्यकर्ते प्रवीण दांडगे, संजय गावंडे, सुदेश गावंडे, गजानन डिवरे, जीवन उपर्वट यांनी जखमीस रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केले. (वार्ताहर)