अज्ञात वाहनाने दुचाकीस उडविले; एक ठार, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 17:07 IST2020-09-05T17:06:59+5:302020-09-05T17:07:53+5:30
सिरसो येथील आकाश विनायक मालधुरे (२८) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अज्ञात वाहनाने दुचाकीस उडविले; एक ठार, एक गंभीर जखमी
मूर्तिजापुर : दर्यापूर रोडवर सिरसो नजीक एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सिरसो येथील आकाश विनायक मालधुरे (२८) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर लहान भाऊ राहूल विनायक मालधुरे (२४) हा गंभीर जखमी झाला. घटना ५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन सिरसो फाट्या पासून काही अंतरावर असलेल्या इच्छापूर्ती मंदिरा दरम्यान घडली.
तालुक्यातील सिरसो येथील रहिवाशी आकाश विनायक मालधुरे व राहूल विनायक मालधुरे हे दोघे सख्खे भाऊ क्रमांक नसलेल्या दुचाकीवरुन अकोट येथे कामानिमित्ताने जात असताना गावाजवळच त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत आकाश हा घटनास्थळीच ठार झाला. तर लहान भाऊ राहूल हा गंभीर जखमी झाला. जखमी राहूलला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच वंदेमातरम आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकार, विक्की गावंडे, पुंडलिक सांगेल यांनी विशेष सहकार्य केले. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.(शहर प्रतिनिधी )