बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत; मात्र आवक कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST2021-07-15T04:14:34+5:302021-07-15T04:14:34+5:30
डाळींचे वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने डाळींवर स्टॉक लिमिट घातले आहे. हा आदेश तातडीने अंमलात आणला गेला आहे. ...

बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत; मात्र आवक कमी!
डाळींचे वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने डाळींवर स्टॉक लिमिट घातले आहे. हा आदेश तातडीने अंमलात आणला गेला आहे. हे घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, गिरणी मालक आणि आयातदारांसाठी लागू केले आहे. डाळींचे वाढते दर लक्षात घेता, सरकारने मूग वगळता इतर डाळींवर ३१ ऑक्टोबरपर्यंत साठवणुकीची मर्यादा घातली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या या शेतीमाल स्टॉक लिमिटच्या विरोधात अकोला शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवार, ५ जुलैपासून बाजार समितीचे खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार बंद केले होते. त्यामुळे बाजार समितीचे दैनंदिन लाखोंचे व्यवहार खोळंबले होेते; मात्र व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतल्याने सोमवारपासून सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले; परंतु बाजार समितीत धान्याची आवक कमी प्रमाणात आहे.
दोन दिवसांमध्ये झालेली धान्याची आवक...
सोमवार २,२५६ क्विंटल
मंगळवार १,३२९ क्विंटल
खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे शेतीमाल शिल्लक नाही. परिणामी, बाजार समितीत आवक कमी आहे. पुढील दोन महिने हीच स्थिती कायम राहणार आहे.
- अनिल पेढीवाल, व्यापारी