शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर-खामगाव मार्गावर कंटेनरची दुचाकीस धडक, अकोल्याचे दोन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 16:54 IST

बाळापूर : येथून खामगावकडे जाणाऱ्या  राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वर भरधाव अज्ञात कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अकोल्याचे दोन युवक ठार झाले.

ठळक मुद्देअकोल्यातील किशोर नांदे आणि अजय माळेकर हे युवक दुचाकी क्र.एमएच ३० व्ही १४०० ने राष्टीय महामार्गाने जात होते.बाळापूर आणि खामगाव तालुक्याच्या सिमारेषेनजीक पिवळा नाल्याजवळ अज्ञात कंटेनरने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली.यामध्ये किशोर नांदे हा जागीच ठार झाला, तर उपचारादरम्यान अजय माळेकरचा मृत्यू झाला.

- अनंत वानखडेबाळापूर : येथून खामगावकडे जाणाऱ्या  राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वर भरधाव अज्ञात कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अकोल्याचे दोन युवक ठार झाले. ही घटना बाळापूर शहरापासून दोन कि.मी. अंतरावर राष्ट्रीय  महामार्गावर सोमवारी दुपारी १.१५ वाजता घडली. किशोर मनोहर नांदे (३५) व अजय गंगाधर माळेकर अशी मृतकांची नावे आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.अकोल्यातील किशोर नांदे आणि अजय माळेकर हे युवक दुचाकी क्र.एमएच ३० व्ही १४०० ने राष्ट्रीय  महामार्गाने जात होते. बाळापूर आणि खामगाव तालुक्याच्या सिमारेषेनजीक पिवळा नाल्याजवळ अज्ञात कंटेनरने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये किशोर नांदे हा जागीच ठार झाला तर अजय माळेकर हा गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमी युवकास तातडीने बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान अजय माळेकरचा मृत्यू झाला. या अपघातामुळे राष्टीय महामार्गावर दोन्ही बाजुने मोठी रांग लागली होती. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन वाहतुक सुरळीत केली.या प्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणBalapurबाळापूरkhamgaonखामगावNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात