विवाहितेसोबत बळजबरी करणाऱ्या आरोपीला दोन वर्षांचा कारावास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 12:39 IST2019-03-31T12:39:49+5:302019-03-31T12:39:56+5:30

अकोला: घरात घुसून विवाहितेला शारीरिक संबंधासाठी बळजबरी करणाऱ्या आरोपीला चौथे प्रथमश्रेणी न्यायाधीश एस. बी. विजयकर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Two years imprisonment for molestation a married man! | विवाहितेसोबत बळजबरी करणाऱ्या आरोपीला दोन वर्षांचा कारावास!

विवाहितेसोबत बळजबरी करणाऱ्या आरोपीला दोन वर्षांचा कारावास!

अकोला: घरात घुसून विवाहितेला शारीरिक संबंधासाठी बळजबरी करणाऱ्या आरोपीला चौथे प्रथमश्रेणी न्यायाधीश एस. बी. विजयकर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती रात्रपाळीत नोकरी करीत असल्याने ती घरात एकटी राहायची. ५ मार्च २0१४ रोजी रात्री ती घरात एकटी असताना आरोपी ओंकार शंकरराव वाघमारे (रा. मोठी उमरी) हा घरात घुसला आणि त्याने विवाहितेला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी केली; परंतु विवाहितेने त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपी ओंकार वाघमारे याने तिला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला दोन वर्षे सश्रम कारावास व २0 हजार रुपये दंड सुनावला. (प्रतिनिधी)

Web Title: Two years imprisonment for molestation a married man!