कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 22:05 IST2021-01-10T21:13:09+5:302021-01-10T22:05:30+5:30
Accident News लाखपुरीजवळ सायंकाळी अपघात झाला.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
मूर्तिजापूर : तालुक्यातील लाखपूरी शकुंतला रेल्वे गेटवर कारच्या धडकेत दुचाकीस्वार घटनास्थळीच ठार झाल्याची घटना १० जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली. तालुक्यातील दहातोंडा येथील माजी प्राचार्य नामदेवराव सुखदेवराव जाधव (५९) हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच एच ३० बीई २५६६ ने अकोट येथून लग्न समारंभ आटोपून गावी परत येत असताना लाखपूरी शकुंतला रेल्वे गेटवर समोरुन भरधाव येणाऱ्या एमएच २७ एआर ७३२२ या कारने अमोरासमोर जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाने धडक दिल्यानंतर अपघातस्थळावरुन पळ काढला, परंतु काही नागरीकांनी कार नंबर घेतल्याने ती कार नेमकी कोणाची आहे याचा तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.