शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरनं दुचाकीस्वाराला तब्बल २ किलोमीटरपर्यंत नेलं फरफटत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 10:42 IST

मध्यरात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

मूर्तिजापूर (अकोला ): राष्ट्रीय महामार्गावर हेंडज फाटा दरम्यान भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास धडक देऊन त्याला तब्बल दोन किलोमीटर फरफटत नेल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजताचे दरम्यान घडली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.कंटेनर क्रमांक (एनएल ०१ ए बी १९३९) हा अमरावतीच्या दिशेने ट्रॅक्टर वाहून नेत होता. दरम्यान नितीन सुधाकर डाबेराव (३९) रा. पळसो बढे त्यांच्या दुचाकीने (एमएच २७ सीई १८७१) अमरावतीला जात होते. मागून येणाऱ्या कंटेनरने नितीन डाबेराव यांना एका बाजूने धडक दिली. त्यामुळे कंटेनरला असलेला हूक थेट त्यांच्या डोक्यात घुसला. त्याला अडकून तब्बल दोन किलोमीटरचे वर फरफटत गेले. ही बाब दुसऱ्या वाहनाच्या चालकाने कंटेनर चालकाच्या लक्षात आणून दिली. तेव्हा चालकाने डाबेराव यांचा मृतदेह महामार्गाच्या कडेला टाकून दिला. या घटनेची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. अपघात झालेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांना मृतदेह आढळून आला. ढाबा चालक सतनामसिंग निरांजनसिंग गील यांच्या फिर्यादीवरून कंटेनर जप्त करुन पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. महाकाय कंटेनरला दोन्ही बाजूला रेडिअम पट्टया व इंडिकेटर लाइट नसल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. चालकाविरुद्ध  मोटर कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार रहिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेजराव तायडे करत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात