अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:15 IST2021-01-09T04:15:48+5:302021-01-09T04:15:48+5:30
--------------------- सावरा विद्युत फिडर बनले डोकेदुखी वरूर जऊळका : सावरा फिडरअंतर्गत येणाऱ्या वरूर जऊळका व परिसरातील लोतखेड खापरवाडी विटाळी ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
---------------------
सावरा विद्युत फिडर बनले डोकेदुखी
वरूर जऊळका : सावरा फिडरअंतर्गत येणाऱ्या वरूर जऊळका व परिसरातील लोतखेड खापरवाडी विटाळी सावरगाव आदी गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याकडे संबंधित अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित हाेत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. अचानक विद्युत प्रवाह खंडित हाेत असल्याने घरातील इतर विद्युत उपकरणे बंद होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांपासून सतत हा प्रकार सुरू असून, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करून हा प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी हाेत आहे. सावरा फिडरवरील रिलेमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे ही समस्या उद्भवत असल्याची चर्चा आहे. रात्री सुद्धा विजेचा लपंडाव सुरू असतो व बऱ्याचवेळा विद्युत पुरवठा रात्री गेल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू करण्यात येते, परंतु पुन्हा तीच समस्या निर्माण होते. तरी वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने देऊन विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यात, यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.