अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:15 IST2020-12-22T17:13:58+5:302020-12-22T17:15:37+5:30
स्वाती श्रीकृष्ण अनभोरे (वय ४५) रा. मुंबई असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; महिला ठार
मूर्तिजापूर : अज्ञात वाहनाने दुचाकीस पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महार्गावरील एका ढाब्याजवळ २२ डिसेंबर राेजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. स्वाती श्रीकृष्ण अनभोरे (वय ४५) रा. मुंबई असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
स्वाती श्रीकृष्ण अनभोरे या मुंबईवरुन काही दिवसांपूर्वी कामा निमित्ताने मामाकडे आल्या होत्या. मुंबई येथील लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांना देण्यासाठी मूर्तिजापूर येथील मामाकडे आल्या होत्या. एमएच ३० एपी ५५९ या क्रमांकाच्या दुचाकीवरून अकोल्यावरुन मूर्तिजापूरकडे येत असताना गावालगतच्या वैशाली ढाब्याजवळ पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या घटनेत त्या रस्त्यावर कोसळून ठार झाल्या. दुचाकी चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणला.