मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक; युवक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:56 IST2021-01-08T04:56:59+5:302021-01-08T04:56:59+5:30
शुभम जगदीश वाकोडे (२१) हा भाजीपाला विकण्यासाठी मूर्तिजापूर येथे आला होता. भाजीपाला विक्री करून सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान दुचाकी ...

मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक; युवक गंभीर
शुभम जगदीश वाकोडे (२१) हा भाजीपाला विकण्यासाठी मूर्तिजापूर येथे आला होता. भाजीपाला विक्री करून सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान दुचाकी क्रमांक (एमएच ३० एक्स ४६३३) ने घरी परतत असताना पाठीमागून येणाऱ्या मालवाहू वाहन ४०७ क्रमांक (एमएच २९ एम १००८) ने हातगावनजीक दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शुभम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, काही काळासाठी या रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकरणी संतापलेल्या नागरिकांची शहर पोलिसांनी मनधरणी करून वाहतूक सुरळीत केली. (फोटो)
दुचाकीला अज्ञात वाहनाने कावा मारल्याने इसम गंभीर
मूर्तिजापूर-सिरसो फाटा दरम्यान अपघाताचे प्रमाण वाढले असून, बुधवारी सकाळी ९:३० वाजता सिरसो फाट्यावर एका दुचाकीस अज्ञात वाहनाने कावा मारल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्य़ात पाडल्याने व्यक्ती गंभीर जखमी झाली. मूर्तिजापूर-दर्यापूर रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण झाल्याने वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ६ जानेवारी रोजी रामकृष्ण बागराज पवार (५०) रा. खैरी (आसेगाव पूर्णा) हे मुलीच्या पत्रिका वाटून गावाकडे दुचाकी क्रमांक (एमएच २७ बीसी ८६३४) ने गावी परत जात असताना सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान सिरसोफाट्यावर अज्ञात वाहनाने कावा मारल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटताच भरधाव दुचाकी घेऊन ते रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दगडावर आदळल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे. (फोटो)