राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वार मुलास ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 16:53 IST2021-06-27T16:51:36+5:302021-06-27T16:53:23+5:30
Accident at Murtijapur : ओम प्रदीप बोबडे (१६) रा.पारद असे मृतकाचे नाव आहे.

राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वार मुलास ट्रकने चिरडले
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील पंचवटी हॉटेल समोर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना २७ जून रोजी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान घडली. ओम प्रदीप बोबडे (१६) रा.पारद असे मृतकाचे नाव आहे.
तालुक्यातील पारद येथील रहिवासी असलेला ओम प्रदीप बोबडे (१६) हा काही कामानिमित्त मूर्तिजापूर येथे आला होता दरम्यान एमएच २७ सीक्यू १६७१ कामांच्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर गेला असता अमरावतीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमपी २८ एच ०९८५ ने धडक दिली. त्यात ओम हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच वंचित आपत्कालीन पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा आणला. अपघाता संदर्भात अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नागोराव भांगे व पोलीस शिपाई मोहन भेंडारकर करीत आहेत.