दुचाकींचा अपघात; एक ठार
By सचिन राऊत | Updated: December 3, 2023 18:17 IST2023-12-03T18:16:17+5:302023-12-03T18:17:02+5:30
या अपघात प्रकरणाचा तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.

दुचाकींचा अपघात; एक ठार
सचिन राऊत, अकोला : बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कोळंबी बस थांब्यानजीक दोन दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली.
दुचाकी क्रमांक एम. एच. ४६ डीएक्स २०१८ व दुचाकी क्रमांक एम. एच. ३० डी.आर.४४२७ या दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात धर्मेंद्र धनेश्वर पाटील (४७, रा. रायगड) हे गंभीर जखमी झाले. जखमीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नातेवाइकांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी दुचाकी क्रमांक एम. एच. ३० डीआर ४४२७ या दुचाकीस्वाराविरुद्ध चौकशी करून गुन्हा दाखल केला. या अपघात प्रकरणाचा तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.