रस्त्याच्या निकृष्ट व भ्रष्ट कामामुळे गेले दोन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:31+5:302021-02-05T06:18:31+5:30
अकोला : अकोला ते मंगरूळपीर या रस्त्याच्या निकृष्ट व भ्रष्ट कारभारामुळे अपघात होऊन दोन जणांचक मृत्यू झाला. या प्रकरणी ...

रस्त्याच्या निकृष्ट व भ्रष्ट कामामुळे गेले दोन बळी
अकोला : अकोला ते मंगरूळपीर या रस्त्याच्या निकृष्ट व भ्रष्ट कारभारामुळे अपघात होऊन दोन जणांचक मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारासह तीन अधिकारी अशा चौघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुवार २८ जानेवारी रोजी मुक्काम आंदोलन करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. शिवाभाऊ मोहोड यांनी दिली.
अकोला ते मंगरुळपीर मार्गाचे काम नुकतेच काही दिवसांपूर्वी करण्यात आले. परंतु हे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले आहे. रस्त्याच्या कामाचे व्हायब्रेशन मोजले गेले नाही, रोलर पास मोजला गेला नाही, काम सुरू असताना टॅग कोड टाकला गेला नाही. शिवाय या रस्त्याचे काम रात्रीच्या अंधारात करण्यात आले. त्यामुळे अत्यंत निकृष्ट पद्धतीच्या या कामाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने माहिती दिली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कंत्राटदाराने अत्यंत मनमानी पद्धतीने काम करून रस्त्याच्या शोल्डरमध्ये चक्क माती भरली. परिणामी आता या रस्त्यावर अपघात होत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.