दुचाकी अपघातात दोन शिक्षक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:19 IST2021-03-17T04:19:25+5:302021-03-17T04:19:25+5:30

अकोला येथून रवींद्र नानाराव देशमुख (रा.उगवा) (ह.मु.न्यू तापडीया नगर अकोला) आणि रत्नाकर प्रभाकर इंगळे (रा.सिरसोली ता.तेल्हारा) (ह.मु.खडकी अकोला) ...

Two teachers injured in two-wheeler accident | दुचाकी अपघातात दोन शिक्षक जखमी

दुचाकी अपघातात दोन शिक्षक जखमी

अकोला येथून रवींद्र नानाराव देशमुख (रा.उगवा) (ह.मु.न्यू तापडीया नगर अकोला) आणि रत्नाकर प्रभाकर इंगळे (रा.सिरसोली ता.तेल्हारा) (ह.मु.खडकी अकोला) हे * * * * * * * * *पिंजर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयात कर्तव्यावर दुचाकीने जात होते. अजनी फाट्यानजीक डुक्कर आडवे आल्याने दुचाकी घसरून खाली कोसळली. या अपघातात दोघे जण जखमी झाले. अपघाताची माहिती * * * * *पिंजर येथील नीलेश प्रदीपकुमार लहाने यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. जीवरक्षक दीपक सदाफळे हे रुग्णवाहिकेसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमी शिक्षकांना उपचारार्थ अकोला येथे घेऊन गेले, अशी माहिती पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी यांनी दिली.

Web Title: Two teachers injured in two-wheeler accident