दुचाकी-सायकल अपघातात दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 17:58 IST2021-05-19T17:57:28+5:302021-05-19T17:58:01+5:30
Murtijapur News : सायकल व दुचाकी दरम्यान धडक झाल्याने सायकलस्वार व्दारकानाथ कांबळे (६६) व पुंडलिक दशरथ बागडे (५५) हे दोघेही गंभीर जखमी झाले.

दुचाकी-सायकल अपघातात दोघे गंभीर जखमी
मूर्तिजापूर : दुचाकी व सायकल अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान मूर्तिजापूर पिंजर रोडवर एमआयडीसी जवळ घडली.
मूर्तिजापूर येथील व्दारकानाथ कांबळे (६६) हे सायकलने एमआयडीसी येथे कामावर जात असताना, समोरून येणाऱ्या कंझरा येथील पुंडलिक दशरथ बागडे (५५) हे एमएच ३० एचएम २१७९ क्रमांकांच्या दुचाकीवर मूर्तिजापूर कडे येत असताना सायकल व दुचाकी दरम्यान धडक झाल्याने सायकलस्वार व्दारकानाथ कांबळे (६६) व पुंडलिक दशरथ बागडे (५५) हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दोघांनाही गंभीर दुखापत असल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.