डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले
By Admin | Updated: August 23, 2014 23:22 IST2014-08-23T22:37:46+5:302014-08-23T23:22:28+5:30
कारंजा तालुक्यातही दोन रुग्णांना डेंग्युची लागण झाल्याचे २३ ऑगस्ट रोजी समोर आले.

डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले
कारंजा लाड : मानोरा येथील तीन वर्षीय बालकास डेंग्यु आजाराची लागण झाल्याची बाब २२ ऑगस्ट रोजी समोर आली होती. आता कारंजा तालुक्यातही दोन रुग्णांना डेंग्युची लागण झाल्याचे २३ ऑगस्ट रोजी समोर आले. मानोरा येथील ३ वर्षीय बालकास डेंग्यु आजाराची लागण झाल्याचे रक्त तपासणीतून स्पष्ट झाले होते. २३ ऑगस्ट रोजी मानोरा येथे आरोग्य पथक दाखल झाले. परिसराची पाहणी करून वरिष्ठ अधिकार्यांनी योग्य त्या सूचना दिल्या. मानोरा येथील डेंग्यू रुग्णाला पुढील उपचाराकरिता अकोला येथे पाठविण्यात आले. दरम्यान २३ ऑगस्ट रोजी कारंजा येथेही दोन डेंग्यू रुग्ण आढळून आले. डॉ.नवल सारडा यांच्या रुग्णालयात तालुक्यातील लोहगाव येथील ९ वर्षीय बालक मोहन केंद्रे व १0 वर्षीय बालीका गायत्री देशमुख रा.कारंजा हे उपचाराकरिता आले असता, डेंग्यूची लक्षणे डॉक्टरांच्या निदर्शनात आली. त्या रुग्णांची तपासणी केली असता डेंग्यु असल्याचे पॉझिाटिव्ह दाखविल्यामुळे डॉ.सारडा यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. कारंजा व मानोरा तालुक्यात डेंग्युच्या रुग्णामध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी भागात जंतुनाशक फवारणी करावी अशी मागणी होत आहे.