अकोला जिल्हा परिषदेत दोन अधिकारी रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:30 IST2019-10-02T14:29:58+5:302019-10-02T14:30:03+5:30

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) पदावर मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. व्ही. गोहाड मंगळवारी रुजू झाले.

Two officers were take charge at Akola Jilha Parishad | अकोला जिल्हा परिषदेत दोन अधिकारी रुजू

अकोला जिल्हा परिषदेत दोन अधिकारी रुजू

अकोला: ग्रामविकास विभागाने अकोला जिल्हा परिषदेतील गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर त्याजागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्याने रिक्त पदांची मोठी समस्या उभी ठाकली आहे. रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदांवर अद्याप कुणाचाही आदेश झालेला नाही. त्याचवेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) पदावर मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. व्ही. गोहाड मंगळवारी रुजू झाले.
काही दिवसांपूर्वी तेल्हारा पंचायत समिती गटविकास अधिकाºयांची बदली झाली. त्यांच्या जागेवर इतर अधिकाºयाला पदस्थापना मिळालेली नाही. पातूर, अकोट, मूर्तिजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांचीही बदली झाली. त्यापैकी दोनच पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी देण्यात आले. इतर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची बदली केल्यानंतर त्या ठिकाणी एकही अधिकारी दिलेला नाही. जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. व्ही. गोहाड यांची बदली झाली. त्यांनी मंगळवारी प्रभार घेतला; मात्र इतर पदे रिक्तच असल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारावर आणखी ताण येणार आहे.

 

Web Title: Two officers were take charge at Akola Jilha Parishad