अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन मोटारसायकस्वार ठार

By Admin | Updated: December 22, 2014 01:14 IST2014-12-22T01:14:24+5:302014-12-22T01:14:24+5:30

लोहारा-शेगाव रस्त्यावरील अपघात : मृतक अंत्री मलकापूरचे.

Two motorcyclists killed in an unidentified vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन मोटारसायकस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन मोटारसायकस्वार ठार

उरळ (अकोला) : नजीकच्या अंत्री मलकापूर येथील दोघेजण रविवार, २१ डिसेंबर रोजी रात्री ९ .१५ वाजताच्या सुमारास मोटारसायकलने लोहार्‍याहून शेगावकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील एकाचा घटनस्थळीच तर दुसर्‍याचा शेगावमधील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंत्री मलकापूर येथील माजी सरपंच गुलाबराव राजाराम गव्हाळे (४५) व चंद्रभान हरिभाऊ गावंडे (५५) या दोघांना भजने म्हणण्याचा छंद होता. ते शनिवारी रात्री शेगावनजीकच्या वरखेड येथे आयोजित भजनाच्या कार्यक्रमात भजने म्हणण्यासाठी एम.एच. ३0 -२९६ क्रमांकाच्या मोटारसायकलने अंत्री मलकापूर येथून वरखेडकडे जाण्यास निघाले. ते लोहार्‍याहून शेगाव मार्गाने वरखेडकडे जात असताना रस्त्यात रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास भरधाव वेगात जाणार्‍या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात गुलाबराव गव्हाळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चंद्रभान गावंडे शेगावच्या सईबाई मोटे रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावले. हे वृत्त लिहिपर्यत पोलिस स्टेशनला कसलीही नोंद झालेली नव्हती.

Web Title: Two motorcyclists killed in an unidentified vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.