अकोला जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 18:40 IST2021-07-26T18:40:34+5:302021-07-26T18:40:40+5:30
Corona Cases in Akola : सद्यस्थितीत ६१ रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अकोला जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
अकोला : जिल्ह्यात सोमवार, २६ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७,७५० झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२५ तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी अकोला शहरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, तर उर्वरित १२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. रविवारी करण्यात आलेल्या ३८१ रॅपिड चाचण्यांमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६१ रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.